JSPM's Imperial Adyapak Vidyalay, Hadapsar, Pune

Careers | Campuses

Academics

About Academics

अध्यापक विद्यालयाचे शैक्षणिक प्रवेश जुलै महिन्यात झाल्यावर प्रथम वर्षाचे वर्ग तयार होतात. तसेच द्वितीय वर्ष जून महिन्यात प्रथम वर्षांमध्ये अध्यापनासाठी छात्राध्यापकांना १२ विषय आहेत. तसेच एकूण कामाचे परीक्षा कालावधीसह २२० दिवस आहेत. आठवडे तासिका ४५ मिनिट याप्रमाणे आहे. प्रत्येक महिन्यात किमान एक आठवडे शाळेमध्ये आंतरवासिता आहे. तसेच द्वितीय वर्ष अभ्यास आराखडा यामध्ये एकूण १२ विषय अध्यापनासाठी असून एकूण कामाचे दिवस २२० परीक्षेसह आहेत तसेच आठवडा तासिका ४५ मिनिट या प्रमाणे आहेत. तसेच प्रत्येक महिन्यात किमान एक आठवडा शाळेमध्ये आंतरवासिता नियोजन आहे. प्रथम वर्ष मूल्यमापन प्रक्रियेत थेअरीसाठी = ३०० गुण व प्रात्यक्षिकासाठी =७२० गुण आहेत. तसेच एकूण गुण =१००० आहेत.
द्वितीय वर्षासाठी = थेअरीसाठी = २८० गुण आहेत व प्रात्यक्षिकासाठी =७२० गुण आहेत. तसेच एकूण गुण =१००० आहेत. * Co- छात्राध्यापकांना प्रत्येक विषय शिकवण्या अगोदर त्या विषयांची उद्दिष्टे ठेवलेली आहेत. ती पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात.प्रथम वर्षांमध्ये एकूण १२ विषय अध्यापनासाठी आहेत. यामध्ये काही ठराविक विषय व त्यांची उद्दिष्टे खालील प्रमाणे आहेत.

पाठ्यक्रम क्र. एफ-१ विषय- बालकांचा विकास व 'स्व ' ची जाणीव

पाठ्यक्रम भूमिका- बालकाची वैशिष्ट्ये कोणती बालक स्वतःकडे कसे पाहते ?ते ज्या घरी वाढते त्या परिसरातून शेजारच्या समाजाकडून ते काय शिकते? स्वतःची तुलना ते इतरांशी कसे करते? बालकाच्या आशा आकांशा कोणत्या? व त्यांच्या पूर्ततेसाठी ते कसे प्रयत्नशील राहते?.तसेच त्याचा आपल्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे? व कसा असायला हवा? याचे भान शिक्षकाला असायला हवे.
उद्दिष्टे -
१) बालकांचा विकास कसा होतो? हे समजून घेण्यास मदत करणे.
२) बालकांच्या शारीरिक विकासाची व बौद्धिक विकासाची वैशिष्ट्ये लक्षात आणून देणे.
३) विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासातील भावनिक विकासाचे स्थान व महत्व समजून घेण्यास मदत करणे.
४) विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्या गरजा कोणत्या हे जाणण्यासाठी व त्या गरजांची पूर्ती करण्यासाठी सक्षम बनविणे.
५) विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्या गरजा कोणत्या हे जाणण्यासाठी व त्या गरजांची पूर्ती करण्यासाठी सक्षम बनविणे.
६) आपल्या विध्यार्थ्याने स्वतःमधील शक्ती स्थानाचा शोध कसा घ्यावा. या साठी मार्गदर्शन करण्यासाठी सक्षम बनविणे.
७) व्यक्तिमत्तव विकासासंबंधीची सम्यक विकासाची संकल्पना समजून घेण्यास मदत करणे.
८) विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलतेचा विकास कसा करावा यासंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी समर्थ बनवणे.
९) शिक्षणाचा अंतिम हेतू विश्वशांती समाजातील एकता हा असून त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी सजग बनविणे.

पाठ्यक्रम क्र.एफ-५ भाषा विषयाचे अध्ययन-अध्यापनशास्त्र.

पाठयक्रम भूमिका - मराठी भाषा हि आपल्या विचार , भावना यांच्या आदान-प्रदानाचे महत्वाचे व प्रभावी साधन आहे. तसेच माहिती संक्रमणाचे प्रमुख माध्यम आहे. शालेय शिक्षण प्रक्रियेचे विचार करता मराठी भाषेवर प्रभुत्व असण्याचे महत्व लक्षात घेऊन जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे. श्रवण, भाषण, वाचन, लेखन ही मराठी भाषेतील मूलभूत कौशल्य आहेत. यांचा विकास व दृढीकरण ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवण्यात आली आहेत.
उद्दिष्टे -
१) प्राथमिक स्तरावरील मराठी विषयाच्या अध्यापन पद्धती निगडित समस्या जाणण्यास समर्थ करणे.
२) मराठी भाषा अध्ययन-अध्यापन वातावरण निर्मिती प्रक्रिया सुलभ करणे.
३) अध्यापन पद्धती , अध्यापन तंत्रे यांच्या उपयोजनासाठी सक्षम बनवणे.
४) नियोजनाची विविध तंत्रे , टप्पे विकसित करण्यास मदत करणे.
५) अभ्यासक्रम,पाठ्यक्रम ,पाठ्यपुस्तक व मार्गदर्शक शैक्षणिक साहित्य यांच्यातील सहसंबंध जाणण्यास सक्षम बनविणे.

पाठ्यक्रम क्र. एफ-७ विषय- गणित अध्ययन-अध्यापनशास्त्र

पाठयक्रम भूमिका - गणित विषयात संबोध , सूत्रे यावर जास्त भर दिला जातो. गणित केवळ आकडेमोड करणे, मोजमाप करणे, यापुरतेच मर्यादित नसून तर्कशुद्ध विचार, अमूर्त संकल्पनांचे विश्लेषण, दैनंदिन अनुभवांच्या क्षमता विकसित करण्याचे महत्वाचे साधन आहे.
उद्दिष्टे-
१) छात्राध्यापकांना अंकगणितीय, बीजगणित , भूमितीय , संख्याशास्त्रीय संबोध विषयी आकलन क्षमता विकसित करण्यास मदत करणे.
२) बालकापर्यंत गणितातील संबोध पोहोचविण्यासाठी आवश्यक त्या क्षमता छात्राध्यापकामध्ये विकसित करणे.
३) गणित विषयाची भीती कमी करणे.
४) गणित विषयात आलेले नवीन संबोध समजावून घेऊन आपली स्वतःची अध्यापनाची दिशा स्पष्ट करण्यास सक्षम बनविणे.

पाठ्यक्रम क्र. एफ-६ विषय- इंग्रजी : अध्ययन अध्यापनशास्त्र -भाग -१

पाठ्यक्रम भूमिका – The theoretical knowledge learnt in paper proficiency in English needs to be given a practical touch. The princilples of the proficiency and the knowledge can be realized through the paper pedagogy of English teaching methodology has seen lot of changes whenever the syallbus has changed. Now we believe that the classroom transaction can be effective only if the teachers clearly follow the learner centred methods.
Course Objective:-
1) Help to raise issues related to the pedagogy of English at the elementary stage.
2) Facilitates the process of creating learning situations.
3) Help to use different methods , approaches and techniques in teaching English.
4) Relate the curriculum and syllabus with the instructional materials of Std. I to Std V.
5) Facilitate understanding of grammatical accuracy and the pedagogy required to develop it.

द्वितीय वर्ष पाठ्यक्रम क्र. एफ-३ विषय- शिक्षणातील नवीन विचारप्रवाह

पाठ्यक्रम भूमिका – प्राथमिक स्तरावरील सेवापूर्व प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रमात बदल केलेला आहे.या पाठ्यक्रमात २१ व्या शतकातील आवश्यक वाटलेले शैक्षणिक घटक अंतर्भूत करण्यात आलेले आहेत.शिक्षणामध्ये होत असलेले नवनवीन प्रयोग, येऊ घातलेले नवनवीन विचारप्रवाह यांचा विचार केल्यास प्राथमिक स्तरावरील शिक्षकांमध्ये अद्यावत असणे गरजेचे वाटते.
उद्दिष्टे-
१) शालेय जीवनात जाणवणाऱ्या समस्या सोडविण्यास मदत करणे.
२) नवोपक्रमांची ओळख होण्यास मदत करणे.
३) शिक्षणातील नवीन विचारप्रवाह जाणून घेण्यास सक्षम करणे.
४) समाजासाठी आवश्यक असे नैतिक अधिष्ठान व व्यवस्थापन विषयक दृष्टिकोन विकसित करणे.
५) कालानुरूप येणारे नवीन विचारप्रवाह जाणून घेण्यास सक्षम करणे.

Course F-4 Proficiency in English – Part II

About the course – In this rapidly growing economic world, English is a language that bridges the performance and communication gap between different faces of the globe. As a teacher , one of our goals is to build truly global citizens from the students we teach in our schools.
Course Objects :-
1) Read with fluency, intonation and stress.
2) Read for global and local comprehension to enhance knowledge.
3) Develop proficiency in different types of writing for real life applications.

पाठ्यक्रम क्र. एस-७ विषय- विज्ञान व गणित : अध्ययन-अध्यापनशास्त्र

पाठ्यक्रम भूमिका - मानवी जीवनाचा विकास होण्यामागे तसेच मानवी जीवन सुकर होण्यासाठी गणित व विज्ञानाची प्रमुख भूमिका आहे. दैनंदिन जीवनात घडणारी प्रत्येक घटना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या गणित व विज्ञानाशी जोडलेली असते.
उद्दिष्टे-
१) विज्ञानाचे स्वरूप व महत्व यांचा परिचय करून देणे.
२) विज्ञान व गणितातील संकल्पनांची आकलन क्षमता विकसित करण्यास मदत करणे.
३) सामाजिक समस्या सोडवण्यासाठी गणित व विज्ञानाचा उपयोग करण्यास सक्षम बनविणे.
४) विज्ञान , गणित शिकविण्यासाठी आवश्यक असलेली गुणवैशिष्ठये रुजविणे.
५) विज्ञान , गणित विषयातील अभिरुची आणि गणिती व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यास मदत करणे.

पाठ्यक्रम क्र. एस-७ विषय- हिंदी : अध्ययन-अध्यापनशास्त्र

पाठ्यक्रम भूमिका :- विविधता में एकता लाने के लिए एक समृद्ध भाषा की आवश्यकता हैl भारत जैसे महाकाय देश में विविध जाती , धर्मो के लोग रहते हैl उनकी भाषा , रहनसहेन , वेशभूषा अलग-अलग हैl इस बहुभाषी देश में आंतर प्रांतीय संपर्क, विचारों का आदान-प्रदान राष्ट्रीय एव भावात्मक एकात्मता , सवैधानिक मूल्यों को सुसंगत ढंग से एक रखना आवश्यक हैl सभी प्रकार की एकात्मता बढ़ाने के लिए हिंदी एक सशक्त भाषा हैl भारतीय उपखंडो में सत्तर प्रतिशत अधिक प्रांतोमे हिंदी भाषा बोली जाती हैl
उद्देश्य -
१) छात्र अध्यापको को द्वितीय भाषा के रूप में हिंदी का महत्त्व समझा देना
२) भाषिक क्षमताओं का विकास करने के लिए सक्षम करना
३) बोलीभाषा से मानसभाषा की और जाने के लिए सक्षम करना
४) निरीक्षण एव विविध कृतियुक्त उपक्रमों के माध्यम से भाषिक सर्जनशीलता के लिए सक्षम बनाना
५) हिंदी साहित्य के प्रति अभिरुचि जागृत करना

© 2018 . All Rights Reserved | Designed And Developed by Digital Content Development DCD-ARQAC, JSPM-TSSM, Pune. Visitor Count - 284199